संजय दत्तला माफी देऊ नये -मुंडे

March 23, 2013 9:40 AM0 commentsViews: 25

23 मार्च

जालना : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्तला माफी मिळावी की नाही यावर वाद सुरू झाला आहे. संजय दत्तला माफी द्यायला भाजपचा विरोध असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलंय. संजय दत्तला माफी मिळू नये त्यांच्यावर जिल्हा कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे. संजय दत्त हा स्वत:जवळ अनधिकृतपणे शस्त्र बाळगत होता हे सिद्ध झालंय. त्यामुळे त्याला माफी मिळू नये अशी भूमिका गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केली आहे. ते जालन्यात बोलत होते. संजय दत्तला माफी मिळावी यासाठी बॉलिवडूच्या कलाकारांसोबत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उड्या घेतल्या आहे. काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संजय दत्तला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी संजूबाबाला माफी द्यावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र लिहले आहे.

close