बिल्डरांकडून दुष्काळग्रस्तांना 100 पाण्याच्या टाक्यांची मदत

March 23, 2013 9:58 AM0 commentsViews: 12

23 मार्च

नाशिक : येथील क्रेडाई या बिल्डर्स असोसीएशनच्या वतीनं दुष्काळी गावांसाठी 100 पाण्याच्या टाक्यांची देणगी देण्यात आली आहे. प्रत्येकी 4 हजार लिटरच्या या टाक्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नाशिकमधल्या दुष्काळी तालुक्यांमधल्या गावांमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय येवला, मनमाड या परिसरातल्या वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि गावतळ्यांमधला गाळ काढण्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती क्रेडईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

close