पाकिस्तानी नेत्यांची युद्धाची भाषा सुरूच

December 24, 2008 4:45 PM0 commentsViews: 1

24 डिसेंबर भारताला युद्ध नको आहे, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. पण पाकिस्ताननं मात्र युद्धाची भाषा सुरूच ठेवलीय. पाकिस्तानला भारताबरोबर तणाव नकोय, असं पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर पाकिस्तानची जनता आणि लष्कर देशाचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत, असा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनीही भारतानं पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याला कमी लेखू नये असा इशारा दिला. आमच्यावर होणारा कोणताही हल्ला रोखायला लष्कर सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय. जॉइन्ट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन जनरल तारिक माजिद यांच्याशी चर्चा करताना झरदारी यांनी हे वक्तव्य केलंय.

close