भारताची घसरगुंडी, 8 बाद 266 धावा

March 23, 2013 12:50 PM0 commentsViews: 9

23 मार्च

दिल्ली : चौथ्या टेस्ट मॅचच्या दुसर्‍या दिवशी रंगतदार बनली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 262 रन्सवर गुंडाळणार्‍या भारताची इनिंग 8 विकेटवर 266 रन्स अशी अवस्था झाली आहे. स्पीनला साथ देणार्‍या दिल्लीच्या कोटला पिचवर भारतीय बॅटिंगही गडगडली. ऑस्ट्रेलियाचा स्पीन बॉलर नॅथन लिऑननं तब्बल 5 विकेट घेतल्या. चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली विजयने पहिल्या विकेटसाठी 108 रन्सची पार्टनरशिप केली. पुजारा 52 तर मुरली विजय 57 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. विराट कोहली 1 तर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अजिंक्य रहाणे 7 रन्सवर आऊट झाले. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोणीही मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरले. दुसर्‍या दिवस अखेर भारताने 8 विकेट गमावत 266 केले असून 4 रन्सची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजमध्ये भारतीय टीमचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी..चारही टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सने कमाल केली. दिल्ली टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सने ऑस्ट्रेलियाला दणका दिला. विशेषता जबरदस्त फॉर्मात असलेल्या आर अश्विननं या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची निम्मी टीम गारद केली.

भारतीय बॉलर्सचा दबदबा

जेम्स पॅटिनसनला आऊट करत प्रग्यान ओझाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगला फुलस्टॉप लावला. पण त्याचबरोबर त्याने आपल्या टेस्ट कारकीर्दीत 100 विकेटचा टप्पाही पार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये पहिल्या दोन टेस्टमध्ये ओझाला संधी मिळाली नव्हती. पण पुढच्या दोन टेस्टमध्ये हरभजनऐवजी ओझाला टीममध्ये संधी देण्यात आली. चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ओझाला फक्त 1 विकेट घेता आली. पण पॅटिनसनची विकेट त्याची शंभरावी विकेट ठरली. शंभरहून अधिक विकेट घेणारा ओझा भारताचा 18 बॉलर ठरला. 22 मॅचमध्ये त्यानं 100 विकेट घेतल्यात आणि 47 रन्समध्ये 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

close