राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत बदलापूरचे 4 खेळाडू

December 24, 2008 5:57 PM0 commentsViews: 7

24 डिसेंबर गुरुदासपूरस्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं 24 ते 27 डिसेंबर या काळात पंजाबमधील गुरुदासपूर इथं राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत.स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये बदलापूरमधील कारमेल कॉन्व्हेंट शाळेतील 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुणाल अभय साळुंखे, प्रतिक प्रकाश राठोड, सहलदेव, उदय धुपकर आणि अथर्व दिलीप कोरडे हे 4 टेबल टेनिसपटू गेले 2 महिने दररोज अडीच ते तीन तास टेबल टेनिसचा सराव करत होते. कारण त्यांच लक्ष आहे ते पंजाबमध्ये होणारी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा. विशेष म्हणजे 16 वर्षाखालील गटात निवड झालेल्या या 4 विद्यार्थ्यांत 3 दहावीचे तर अथर्व हा सातवीचा विद्यार्थी आहे.पण असं असलं तरी या मुलांचा अभ्यासाबरोबरचं खेळाकडेही तितकाचं ओढा आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील जय पराजयापेक्षाही या मुलांना मिळणारा अनुभव त्यांच्या करियरसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.

close