26/11च्या हल्ल्याचा तपास मुंबई क्राइम ब्रॅन्च करणार

December 24, 2008 6:42 PM0 commentsViews: 8

24 डिसेंबर मुंबई26/11 दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण तपास आता मुंबई क्राइम ब्रॅन्च करेल, असं गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत जाहीर केलं . यापूर्वी हा तपास एटीएस आणि क्राइम ब्रॅन्च या दोन्ही यंत्रणा करत होत्या. पण एकाच घटनेचा तपास दोन यंत्रणा कशा करू शकतात, असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यावर जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं 26 नोव्हेंबरच्या रात्री सुरुवातीला रेल्वे स्टेशनवरचा गुन्हा लगेच रेल्वे पोलीस आणि एटीएसकडे देण्यात आला.त्यानंतरचे जे गुन्हे नोंदवण्यात आले त्यांचा तपास एटीस आणि मुंबई क्राइम ब्रॅन्च करत होती. त्यातला एक तपास एटीस करत होती तर तीन गुन्ह्यांचा तपास मुंबई क्रायम ब्रॅन्च करत होती. पण आता एटीसकडून त्या तपासाचं कामकाज काढून घेऊन मुंबई हल्ल्यासंबधी सर्व तपास आता मुंबई क्राइम ब्रॅन्च करणार आहे.

close