करकरेंच्या मृत्यूचा अखेरचा साक्षीदार

December 25, 2008 5:25 AM0 commentsViews: 7

24 नोव्हेंबर, मुंबई26 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या त्या रहस्यमय दहशतवादी हल्ल्याचे एक प्रमुख साक्षीदार म्हणजे जाधव. याच हल्ल्यात करकरे ,कामठे आणि साळसकरांचा मृत्यू झाला होता. काही आठवड्यानंतर त्यांनी गोळीबाराबाबत दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना घटनाक्रमाची जुळवाजुळव करण्यात मदत झाली आणि अंतुलेंनी उपस्थित केलेल्या शंकाचं उत्तर देण्यातही. त्या रात्री नेमकं घडलं तरी काय?रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी करकरे काम आटपून घरी पोहोचले. शहरात झालेल्या गोळीबारबद्दल त्यांना रात्री उशीरा कंट्रोल रूमकडून माहिती मिळाली. माहिती मिळताच ताबडतोब करकरे एका पोलीस अधिकार्‍याला आणि 4 कॉन्स्टेबल्सना सोबत घेऊन सीएसटीला निघाले. सीएसटीपासून थोड्याच अंतरावर करकरेंना कळलं की रस्ता ब्लॉक झालाय. करकरे आणि सहकारी मग सीएसटीला चालत गेले.तिथे त्यांना रेल्वे पोलीसचे अ‍ॅडिशनल डीजीपी के.पी.रघुवंशी भेटले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की दहशतवादी गोळीबार करुन अंजुमन गल्लीच्या दिशेनं गेले आहेत. करकरेंनी त्यांचं बुलेट प्रुफ जाकीट घातलं आणि ते कामा हॉस्पिटलच्या गेटपाशी पोहोचले.रात्री साडे नऊ वाजता इन्स्पेक्टर साळसकर घरी पोहोचले त्यांनी ड्रायव्हरला घरी जायला सागितले. रात्री नऊ पन्नासला क्राईम ब्रँचच्या अतिरिक्त आयुक्तांनी साळसकरांना हल्ल्याबद्दल माहिती दिली. साळसकरांनी त्यांची क्वालिस घेउन घर सोडलं सोबत त्यांनी अरुण जाधव यांना घेतलं. राकेश मारियांनी त्यांना पोलीस हेडक्वार्टरला यायला सांगितलं. पण रस्त्यात दोन पोलीस शिपायांनी त्यांना सागितलं की गोळीबार झालाय. ते तसेच कामा हॉस्पिटलच्या दिशेनं निघाले.रात्री 10 वाजता सहायक आयुक्त अशोक कामठे घरी पोहोचले. पाचच मिनिटात त्यांना घरी कंट्रोल रुमकडून फोन आला. लवकरचं ते आझाद मैदान पोलीस क्लबपाशी पोहोचले त्यांना सांगितलं गेलं की ते कारने कामा हॉस्पिटलपाशी जाऊ शकत नाही म्हणून ते वायरलेस ऑपरेटरसोबत पायी चालत गेले.हे तिन्ही अधिकारी कामा हॉस्पिटलच्या गेटपाशी भेटले. झेवियर्स कॉलेजपाशी त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. करकरे,कामठे आणि साळसकर लगेचच क्वालिस घेउन झेवियर्सच्या दिशेनं निघाले. जाधव यांच्या म्हणण्यानुसार साळसकर गाडी चालवत होते, कामठे समोरच्या सीटवर बसले होते,आणि करकरे मधल्या सीटवर बसले होते. आणि कामठेंच्या सूचनेनुसार साळसकर गाडी हळू चालवत होते. रंग भवन गल्लीतल्या एटीएमजवळून क्वालिस जात असतांना ,दोन दहशतवाद्यांनी झुडूपाआडून गाडीवर गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकार्‍यानी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं.ज्यात दहशतवादी जखमी झाले आणि मोहम्मद अजमल आमिर कसाब जिवंत सापडला.करकरे,कामठे आणि साळसकरांना मात्र आपले प्राण गमवावे लागले.

close