इंजिनिअर खून प्रकरणी बसप आमदाराला अटक

December 25, 2008 5:31 AM0 commentsViews: 3

25 डिसेंबर, उत्तप्रदेशउत्तरप्रदेशमध्ये पीडब्ल्यूटी इंजिनिअरच्या खूनप्रकरणी सत्ताधारी बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आली आहे. शेखर तिवारी असं या आमदाराचं नाव आहे. या आमदारानं आपल्या साथीदारांसोबत मनोज गुप्ता या इंजीनिअरच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनीच मनोजला पोलीस स्टेशनसमोर टाकून दिलं. या मारहाणीतच मनोजचा मृत्यू झाला.मनोजच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मायावती यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आज समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेश बंद पुकारला आहे. त्यांनी मायावतींच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. मुख्यमंत्री मायावती यांनी इंजिनिअर मनोजच्या हत्या प्रकरणी कोणालाही मोकळं सोडलं जाणार नाही असं म्हटलंय. तर या प्रकरणावरून चिडलेल्या इंजिनिअर युनियननं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

close