आ.ठाकूर-कदम यांची जामिनावर सुटका

March 25, 2013 9:08 AM0 commentsViews: 2

25 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणार्‍या आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मंजूर झालाय. दोन्ही आमदारांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. सेशन्स कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये त्यांना जामीनदार द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर कोर्टाने त्यांच्यावर काही निर्बंधही घातले आहेत. दर बुधवारी या ठाकूर आणि कदम या दोघांनाही सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपास अधिकार्‍यांकडे हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करू नये, त्यांना सहकार्य करावे अशी सूचनाही कोर्टाने त्यांना केली आहे. दोन्ही निलंबित आमदार शुक्रवारपासून तुरुंगात होते.

close