अमरावतीत मनसैनिकांकडून ‘इंडिया बुल्स’ची तोडफोड

March 25, 2013 9:18 AM0 commentsViews: 7

25 मार्च

अमरावती : येथे मुंबईपाठोपाठ मनसैनिकांनी इंडिया बुल्सच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेत इंडिया बुल्सवर पिण्याचे आणि शेतीचं पाणी पळवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रात्री मुंबईतील परळमधल्या इंडिया बुल्सच्या कार्यालयावर मनसैनिकांनी हल्ला केला होता. तर आज सकाळी अमरावतीच्या कँप भागातील इंडिया बुल्सच्या कार्यालयामध्ये 15-20 मनसे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. रविवारी रात्री इथल्या इंडिया बुल्स फायनान्स सेंटरच्या कार्यालयाची तोडफोड करणार्‍या मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीय. याप्रकरणातील अजूनही 10 जण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

close