अशोक चव्हाण, देशमुख आणि शिंदेंना क्लीन चीट ?

March 25, 2013 9:30 AM0 commentsViews: 12

25 मार्च

मुंबई : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दोन सदस्यांच्या आयोगाचा अंतिम अहवाल लवकरच विधिमंडळात सादर केला जाणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना क्लीन चीट दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण त्याच वेळी आदर्शला दिलेल्या वेगवेगळ्या परवानग्या आणि सवलतींसाठी काही सनदी अधिकार्‍यांना दोषी धरण्यात आल्याचं समजतंय. नगरविकास खात्याचे माजी प्रधान सचिव रामानंद तिवारी, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक, मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास आणि नगरविकास खात्याचे तत्कालीन सहसचिव पी. व्ही. देशमुख यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचं समजतं. गेल्या वर्षी आयोगाचा अंतरिम अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला होता. त्यात आदर्शची जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. तसंच या जमिनीवर कोणतंही आरक्षण नव्हता असा निर्वाळा देण्यात आला होता. दरम्यान, मुंबई हायकोर्टात सीबीआयने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलंय. त्यामध्ये अशोक चव्हाण यांना आरोपी करण्यात आलंय. तसंच आदर्शची जमीन आपलीच असल्याचा दावा संरक्षण खात्याने केला.

close