टीम इंडियाची कमाल, ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

March 25, 2013 9:47 AM0 commentsViews: 1

25 मार्च

दिल्ली : महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय टीमनं टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच व्हाईटवॉश देण्याची किमया केली आहे. दिल्ली टेस्टच्या तिसर्‍याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आणि चार मॅचची ही सीरज 4-0 अशी जिंकली. रविंद्र जडेजा, आर अश्विन यांची जादूई स्पीन बॉलिंग आणि पुजाराच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात केली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 155 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं 4 विकेच्या मोबदल्यात विजयाचं हे आव्हान पार केलं. भारताची पहिली इनिंग 272 रन्सवर ऑलआऊट झाली. पण याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग अवघ्या 164 रन्सवर गडगडली. ओपनिंगला आलेल्या डेव्हीड वॉर्नर आणि मॅक्सवेलला रविंद्र जडेजानं अवघ्या वीस रन्समध्ये आऊट केलं. यानंतर ठराविक अंतरानं ऑस्ट्रेलियन बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. रविंद्र जडेजानं तब्बल 5 विकेट घेतल्या तर आर अश्विन आणि प्रग्यान ओझाला प्रत्येकी 2 विकेट घेण्यात यश आलं.

close