नांदेडच्या सरकारी रुग्णालयातून अर्भक पळवलं

December 25, 2008 5:40 AM0 commentsViews: 2

25 डिसेंबर, नांदेडसंदीप काळेनांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमधून, एका अर्भकाला पळवण्यात आल्याची घटना समोर आहे. पंचफुला घाटे या महिलेचं बाळ पळवण्यात आलं आहे. पण या घटनेनंतर कुठलाही संबंधित अधिकारी बोलायला तयार नाहीत. या अगोदरही या रुग्णालयात अशा तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय."मुलाला दुध पाजते असं सांगून एका महिलेनं माझ्याकडून मुलाला नेलं. तिच्या मनात असा काही विचार असेल, असं मला वाटलंही नाही." असं पंचफुला घाटे यांनी सांगितलं. हा प्रकार लक्षात आल्या आल्या पंचफुला घाटे यांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र एकही जबाबदार अधिकारी त्यांना भेटू शकला नाही. पोलिसांनीही त्यांच्या बोलण्याची फारशी गंभीर दखल न घेते उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांची तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच गेल्या काही काळात वारंवार अशा घटना घडूनही प्रशासन आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नाकरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

close