संपादकांवर हक्कभंगाचा राज्यभरातून निषेध

March 25, 2013 2:02 PM0 commentsViews: 7

25 मार्च

पीएसआय पोलीस अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग ठरावाचा राज्यभर निषेध होतोय. या ठरावांविरूध्द पत्रकार आणि इतर संघटनांची राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, पालघर, नागपूर, अकोला, सोलापूर, अहमदनगर, धुळे इथं पत्रकारांनी निदर्शनं केली. दोन्ही सभागृहांतले हक्कभंगाचे प्रस्ताव मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी पत्रकारांनी एकमुखाने केली. आमदारांनी पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये, असंही पत्रकारांचं म्हणणं आहे. सोलापुरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं. यावेळी उपस्थितांनी आमदारांच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारच्या निषेधाचा ठराव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला.

close