सफर जेरुसलेमच्या प्रसिद्ध सेपलचर चर्चची

December 25, 2008 5:48 AM0 commentsViews: 24

25 डिसेंबर, इस्त्राईलअलका धुपकरयेशूचा वाढदिवस असलेला 25 डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन आणि ज्यू लोकांसाठी पवित्र मानला जातो. येशू हा येहूदी होता, असं ज्यू लोक मानतात. त्यामुळेच येशू हा ज्यूंसाठी मानाचा आहे. तर येशूला सुळावर चढवणारे ज्यू होते, असं ख्रिश्चन मानतात. येशूला सुळावर चढवल्यानंतरच्या काळात ख्रिश्चन धर्म वाढला. पण या सर्व इतिहासाला जे प्रत्यक्ष साक्षी आहे ते आहे, जेरुसलेम शहरामधलं प्रसिद्ध सेपलचर चर्च.आमची रिपोर्टर अलका धुपकर हिने खास ख्रिसमसनिमित्त आयबीएन लोकमतच्या दर्शकांना प्रसिद्ध सेपलचर चर्चची घडवलेली ही सफर.इस्त्राईलच्या पूर्वेला जेरुसलेम शहर आहे. तीन हजार वर्षांपूर्वी इथं साम्राज्य होतं राजा डेविडचं. ज्यू धर्मियांमध्ये जेरुसलेमला अतिशय महत्त्व आहे. इस्त्रायलची ही राजधानीच. खास पांढर्‍या दगडामधील बांधकामं हे इथलं वैशिष्ट्य. शहरात प्रवेश करतानाच 'ऐतिहासिक' असं स्पिरीट आपोआपच जाणवायला लागतं.हे चर्च म्हणजे पूर्वीच्या काळातली दफनभूमी. अरुंद जिना चढत वरती जावं लागतं. संपूर्ण चर्चमध्ये अंधार. उजेड काय तो फक्त प्रार्थनेसाठी लावलेल्या मेणबत्तांचाच. इथल्या स्टेशन नंबर 11 येथे येशुला फाशी देण्यात आली. अशी पाच स्टेशन्स इथं आहेत ज्याच्या दर्शनासाठी जगभरातून लोकं येतात. "आम्ही त्याची वाट पाहतोय. तो येईल आणि आम्हा सगळ्यांना मुक्ती देईल. त्यामुळेच त्या डोंगरातल्या सिमेट्रीमध्ये दफन होण्यासाठी प्रत्येकाची घाई असते." असं इथल्या एका भाविकानं सांगितलं.पूर्व जेरुसलेम हा सतत राजकीय हल्ल्यांमुळे चर्चेत असला तरीही जेरुसलेमला भेट देणार्‍या पर्यंटकांची गर्दी मात्र वाढतच आहे. इथल्या भाविकांसाच्या भावना या पवित्र चर्चशी घट्ट जोडल्या गेल्यात. सेपलचर चर्चसारखाच इस्त्राएली संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि विविध घटकांचा वेध आमची रिपोर्टर अलका धुपकर हिने घेतला आहे. इस्त्राएलचा हा स्पेशल रिपोर्ट – 'शालोम इस्त्राएल' तुम्ही आमच्या रिपोर्ताज या कार्यक्रमात रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आणि सोमवारी दुपारी साडे बारा आणि संध्याकाळी साडे पाच वाजता पाहू शकता.

close