मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती

March 27, 2013 11:18 AM0 commentsViews: 90

27 मार्च

मुंबई: मराठा आरक्षणासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 4 मंत्री आणि 4 सचिवांची उच्चस्तरीय समिती आज नेमण्यात आली आहे. तसा जीआर सरकारने जारी केला. या समितीला 3 महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सरकारला सादर करायचा आहे. पण ही समिती स्थापन करताना राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकारांवर गदा आणली आहे. आधीच बापट आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं. पण त्यांचा अहवाल पुनर्विचारासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर काही निर्णय होण्याआधीच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली आज समिती नेमली. त्यामुळे एकप्रकारे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नारायण राणे समितीकडे वर्ग झाला आहे.

close