शिर्डीच्या साईमंदिराचा गाभारा सोन्याने मढवणार

December 25, 2008 4:19 AM0 commentsViews: 4

25 डिसेंबर, शिर्डीशिर्डीच्या साईबाबांचा गाभारा आता सोन्याने मढवला जाणार आहे. हैदराबादचे साईभक्त आदीनारायण रेड्डी यांनी गाभार्‍यासाठी लागणारं सोनं दान देण्याचं ठरवलं आहे. या ख्रिसमस मध्ये भाविकांना गाभार्‍याचं हे नवीन रुप पाहायला मिळेल. गाभार्‍यातल्या भिंतीवर तांब्याचे पत्रे लावले जाणार आहेत. त्यानंतर त्यावर 70 किलो सोन्याचा मुलामा दिला जाईल. त्यासाठी खर्च येणारेय 10 कोटी रुपये. रेड्डी यांनी याआधीही साईमंदिरासाठी 11 कोटी रुपयाचे 95 किलो सोन्याचे दागिने दान दिले होते.

close