नाशिक पालिकेच्या आवारात कामगाराचा मृतदेह ठेवला

March 27, 2013 2:12 PM0 commentsViews: 4

27 मार्च

नाशिक महापालिकेच्या घंटागाडीवर काम करणार्‍या कामगाराचा हार्टऍटॅकनं मृत्यू झाला. सुभाष घागरे असं त्या कामगाराचं नाव आहे. संतापलेल्या कामगारांनी त्याचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेत आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सेवा नसल्याने हा मृत्यू झाल्याची त्यांच्या कुटुंबीयांची आणि कामगारांची मागणी आहे. जोपर्यंत त्याच्या कुटुंबीयाला नुकसान भरपाई दिली जात नाही. तोपर्यंत हा मृतदेह महापालिकेतून हलवणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.

close