राज्यभरातील रिक्षाचालकांचा 15-16 एप्रिलला बंद

March 27, 2013 2:21 PM0 commentsViews: 5

28 मार्च

राज्याभरातील रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. पुढील महिन्यात 15 आणि 16 एप्रिलला मुंबई सोडून राज्यातल्या सर्व रिक्षा बंद राहणार आहेत. 1 एप्रिलपासून होणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स मीटर सक्तीविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, बेकायदा वाहतूक रोखावी, परवाना फी कमी करावी, थर्ड पार्टी इंन्शुरन्सचा जाच कमी करावा या मागण्यांसाठीही हा बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईतील रिक्षाचालक युनियनने यात सहभाग घेतला नसल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

close