‘संजय दत्तला माफी दिली तर मला पण द्या’

March 27, 2013 4:15 PM0 commentsViews: 42

27 मार्च

मुंबईत झालेल्या 1993 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दोषी आढळलेला अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ करावी अशी मागणी जोर धरतेय पण आता याच प्रकरणात दोषी आढळलेल्या 70 वर्षांच्या झैब्बुनिसा काझी यांनीही आपली शिक्षा माफ करावी अशी विनंती केली आहे. संजय दत्तवर शस्त्रात बाळगण्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. झैब्बुनिसावरही संजय दत्तसारखेच गुन्हे दाखल आहेत.

संजय दत्तची शिक्षा माफ करण्याची मागणी होतेय. तर मग झैब्बुनिस्साचीही शिक्षा माफ करावी अशी मागणी तिच्या मुलीने प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना केली आहे. यावर काटजू यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत याबद्दल राज्यपाल आणि राष्ट्रपतींना पत्र लिहणार असल्याचं म्हटलं आहे. काटूज यांनीही संजय दत्तला माफी देण्यात यावी यासाठी राज्यपालांकडे मागणी केली आहे. संजय दत्तसाठी बॉलिवूडसह काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदरच त्यांने 18 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे संजय दत्तला झालेली शिक्षा पुरेशी असून त्याला माफी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या मागणीला मात्र शिवसेनेनं विरोध केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानसभेत संजय दत्तला माफी देऊ नये अशी भूमिका मांडली आहे.

close