लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

March 27, 2013 4:44 PM0 commentsViews: 56

27 मार्च

पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेत काम करणार्‍या पाच स्वयंपाकीण महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. याप्रकरणी सातारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या शारदाबाई पवार या संस्थेच्या आश्रमशाळेत काम करणार्‍या या महिला आहेत. 2003 ते 2010 या 7 वर्षात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार या महिलांनी केली. नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आमिष त्यांना देण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. यातल्या तिघींनी 25 मार्चला तर दोघींनी आज तक्रार दाखल केलीय. म्हणजे याप्रकरणी तब्बल 3 वर्षांनी तक्रार दाखल केली आहे.

close