संजय दत्तसाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणारच -काटूज

March 28, 2013 9:53 AM0 commentsViews: 19

28 मार्च

अभिनेता संजय दत्तनं स्वत: माफीसाठी याचिका करणार नाही असं स्पष्ट केलं. पण तरीही मानवतेच्या दृष्टीकोनातून संजय दत्तसाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज करणारच असं माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे. संजय दत्तसोबतच आपण झेब्बुन्निसासाठीही दयेचा अर्ज करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त दोषी आढळला. त्याला कोर्टाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली. या अगोदर त्याने 18 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. संजय दत्त हा काही गुन्हेगार नाही. त्यांने शिक्षा भोगली असून त्याला माफी द्यावी अशी मागणी काटूज यांनी केली होती. झेब्बुन्निसा आणि संजय दत्तवर या प्रकरणात शस्त्रात बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. दोघांवरही गुन्हे सारखे असल्यामुळे काटूज राष्ट्रपतींकडे माफीसाठी अर्ज करणार आहे. मात्र संजय दत्तची शिक्षा माफ केली जाऊ नये असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तर संजय दत्त हे नाटक करतोय. स्वत: माफी न मागता इतरांना तो त्यासाठी तयार करतोय अशी प्रतिक्रिया माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी दिली.

close