क्षितिज ठाकूर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

March 28, 2013 2:34 PM0 commentsViews: 68

28 मार्च

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर जाऊन भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही भेट 1 तास चालली होती. यावेळी क्षितिज ठाकूर यांच्याबरोबर माजी आमदार आणि क्षितिज यांचे वडील हितेंद्र ठाकूरही होते. गेल्याच आठवड्यात पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी क्षितिज ठाकूर आणि अन्य 4 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. मनसेचे आमदार राम कदम यांचाही निलंबित आमदारांमध्ये समावेश होता. या दोन्ही आमदारांना तीन दिवस जेलची हवा खावी लागली होती. यासगळ्या पाश्वभूमीवर ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय. अमरावती इथल्या मनसेच्या जाहीर सभेत पोलिसाला मारहाण करणार्‍यांना माफी नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे मनसे आमदार राम कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्यामुळे आजची भेट महत्वाची ठरणार आहे.

close