न्युझीलंडचा क्रिकेटर जेसी रायडरला बेदम मारहाण

March 28, 2013 10:16 AM0 commentsViews: 7

28 मार्च

न्युझीलंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर जेसी रायडर याला अज्ञात इसमांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. रायडर कोमात असून त्याला आयसीयुत दाखल करण्यात आलं आहे. ख्राईस्टचर्च येथे संघसहकार्‍यांसमवेत रायडर बारमध्ये गेला असात तिथं त्याचं दोन व्यक्तींशी भांडण झालं. या वादानंतर रायडर कारपार्किंगमध्ये जात असताना या इसमांनी हल्ला केला. त्याला लाथा बुक्याने मारहाण केली, त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर आयसीयुत उपचार सुरु आहेत. रायडर न्युझीलंडकडून 18 टेस्ट खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिलकडून खेळणार होता.

close