ठाण्यात 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत

March 28, 2013 10:49 AM0 commentsViews: 10

28 मार्च

ठाणे : येथील कोपरी परिसरात 3 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणार्‍या तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छोटू सिंग असं या नराधमाचं नाव असून त्याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरूणीला उपचारासाठी नजीकच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे कोपरी परिसरातील संतप्त नागरिकांनी आरोपीच्या चहाच्या टपरीची तोडफोड केली आहे. या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी छोटू सिंगला ठाणे कोर्टात हजर केलं असताना मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.

close