शरद पवार यांची प्रकृती उत्तम

March 28, 2013 11:01 AM0 commentsViews: 70

28 मार्च

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. शरद पवार त्यांच्या बंगळुरू, ऊटी आणि म्हैसूरच्या नियोजित दौर्‍यावर आहेत. गेल्या आठवड्यात शरद पवार कोल्हापुरातील सरपंच महापरिषदेच्या उद्धाटन समारंभाला उपस्थित होते. मात्र सरकारी विश्रामगृहावर गेले असता पवारांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अन्य काही चाचण्यासाठी हेलिकॉप्टरने पुण्याला हलवण्यात आले होते. पुण्यात शिवाजीनगर येथील मोदीबाग येथील निवासस्थानी डॉ. रवी बापट यांनी पवारांची तपासणी केली. शरद पवार यांची प्रकृती ठिकाठाक असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांच्या तब्येतीबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. त्यांना पूर्णविराम देण्यासाठी आता राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिलं आहे.

close