शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

March 28, 2013 12:00 PM0 commentsViews: 14

28 मार्च

मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणारं प्रस्तावित शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या पाहणीत गिरगाव चौपाटीपासून समुद्रात साडेतीन किलोमीटर आणि राजभवनपासून दीड किलोमीटर अंतरावर 16 हेक्टर एवढा मोठा खडक सापडला आहे. मात्र स्मारकाचं काम सुरू करण्यापूर्वी शासनाला 25 परवानग्या घ्याव्या लागणार आहेत अशी माहिती पाहणी करून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचं उभारण्याचा विचार सरकार करत आहेत. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध तीन खडकांची जागांबद्दल विचार सुरू आहे.

close