ख्रिसमस उत्साहात पण साधेपणानं साजरा

December 25, 2008 5:24 AM0 commentsViews:

25 डिसेंबरमुंबईतल्या अनेक चर्चमध्ये रात्री ख्रिसमसच्या निमित्ताने मेनबत्त्या लावून ख्रिश्चन बांधवानी येशूची प्रार्थना केली. महालक्ष्मी येथील चर्च तर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मदत म्हणून 35 हजारांची मदत देण्यात आली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ख्रिसमस सणात उत्साह कमी प्रमाणात जाणवला.ख्रिसमसच्या निमित्ताने वसईमध्ये गोठे बनवण्याची प्रथा आहे. येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यात जन्मला म्हणून, ही पद्धत पडली. पण गणपतीतील देखाव्यांप्रमाणेच या गोठ्यातही चालू घडामोडींचं प्रतिबिंब जाणवतं. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रतिबिंब या वर्षी इथं जाणवलं. हा हल्ला नेमका काय होता, याबरोबरच या हल्ल्यात शहीद झालेल्या बहादुरांविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली.वांद्र्याच्या माउंट मेरी चर्चमध्येही ख्रिसमसची प्रर्थना झाली. प्रथेप्रमाणे इथेही मेणबत्त्या प्रकाशित करून ख्रिसमस साजरा करण्यात आला. आपल्या हव्या असणार्‍या वस्तुंच्या मेणाच्या प्रतिकृती माउंट मेरीला अर्पण केल्या जातात. पण 26/11 च्या पार्श्वभूमीवर या वर्षी या वस्तुंच्या विक्रीवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं

close