विधानभवनात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

March 29, 2013 9:50 AM0 commentsViews: 17

29 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सुर्यवंशी मारहाण प्रकरणानंतर आता विधान भवनातली सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर आणखीन करडी केली जाणार आहे. त्यासाठी विधानभवनाच्या चवथ्या मजल्यापर्यंत आणखी चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्वावर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून हे चाळीस फिक्स सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहांचा संपुर्ण आतला भाग, प्रेक्षक आणि अधिकार्‍यासह सर्व गॅलेरीज, आतल्या आणि बाहेरच्या लॉबी धरुन चवथ्या मजल्यापर्यंत हे नवे कॅमेरे बसविले जाणार आहेत. सध्या विधानभवनात केवळ 28 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी पहिल्या मजल्यावर असलेल्या पाच सीसीटूव्ही कॅमेरांनी पीएसआय सुर्यवंशी मारहाणीची घटना कैद केली. पण त्यामधुन निलंबित आमदार आणि पीएसआय सुर्यवंशी यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. म्हणूनच सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ करुन विधानभवनाच्या संपुर्ण बारीक सारीक हालचाली सुध्दा टिपल्या जाणार आहेत.

close