साकीनाक्यामध्ये स्फोटात भिंत कोसळून 6 ठार

March 29, 2013 9:58 AM0 commentsViews: 2

29 मार्च

मुंबई : येथील साकीनाका भागात गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एका घराची भिंत कोसळून पाचजण जागीच ठार झाले आहेत. खैराणी रोडवर के. के. कंपाऊंड मध्ये रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. एका दोन मजली इमारतीची भिंत दुसर्‍या घरावर कोसळल्यानं हा अपघात झाला. सुखा पटेल, त्यांची दोन मुले मंगेश आणि गणेश आणि त्यांच्या दोन नाती या स्फोटात ठार झालेत. एका मोठ्या स्फोटानंतर ही घटना घडल्याचं समजतंय. घटनास्थळी बॉम्बस्कॉड दाखल झालंय. तसंच मदतकार्यही सुरू आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, स्फोटानंतर 200 मीटर अंतरावरच्या दुसर्‍या घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. या घराच्या बाहेर लहान प्रमाणात उद्योग सुरू असावा अशी शंका अधिकार्‍यांना वाटतेय. मात्र अजूनही स्फोट कशामुळे झाला याचे कारण कळू शकले नाही. हा स्फोट गॅस सिलिंडरचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

close