परवेझ मुशर्रफ यांच्यावर भिरकावला बूट

March 29, 2013 10:11 AM0 commentsViews: 19

29 मार्च

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर बूट भिरकावला. जामिनासाठी मुशर्रफ सिंध हाय कोर्टात गेले होते त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मुशर्रफ यांच्यावर बूट भिरकावला. या घटनेनंतर मुशर्रफ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. पाकिस्तानमध्ये होणार्‍या निवडणुकांसाठी मुशर्ऱफ पाकिस्तानात दाखल झाले आहेत. त्यांच्या विरोधात कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोर्टातून बाहेर येत असताना मुशर्रफ यांच्यावर एका व्यक्तीने बूट भिरकावला. मात्र बूट मुशर्ऱफ यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. या अगोदरही मुशर्रफ यांच्यावर इंग्लंडमध्ये एका सभेत बूट फेकला होता.

close