इन्कम टॅक्स अधिकार्‍याला रंगेहात पकडलं

December 25, 2008 7:48 AM0 commentsViews: 4

25 डिसेंबर , मुंबईसीबीआयने आयकर विभागाचे अ‍ॅडिशनल डेप्युटी कमिशनर रुपेश कुमार गुप्ता यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्यांच्या कडून 82 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली. ही रक्कम म्हणजे गुप्ता यांनी मुंबईतल्या वेगवेगऴ्या ठिकाणांवरुन घेतलेली लाच आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आपण हे पैसे कुठेकुठे ठेवले याबाबत माहिती दिली. त्याच बरोबर लाच घेतलेले काही पैसे त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी गुंतवल्याचंही यावेळी सांगितलं. गुप्तावर अँटी करप्शन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल."रुपेशकुमार गुप्ता हे कंपन्यांचा इन्कम टॅक्स कमी दाखवण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेत असत. त्यांच्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली होती. आम्ही शुक्रवारी सापळा रचला आणि चार लाख रुपयांची कॅश स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडलं. त्यांच्य ऑफीसची झडती घेतल्यावर आम्हाला बरीच रक्कम सापडली" अशी माहिती जॉइंट सीबीआय डायरेक्टर ऋषीप्रकाश सिंह यांनी दिली.

close