पोलिसावर हल्ला करणारे नगरसेवकपुत्र अटकेत

March 29, 2013 10:40 AM0 commentsViews: 23

29 मार्च

धुळे : इथं सहपोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे अखेर दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची दोन्ही मुलं देवा सोनार आणि भूषण सोनार यांना आझाद नगर पोलिसांनी अटक आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांनी धनंजय पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात धनंजय पाटील गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन्ही नगरसेवकपुत्र फरार झाले होते. या प्रकरणात एकूण 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यातल्या दोन आरोपींना अटकही करण्यात आली. चंद्रकांत सोनार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं यापूर्वीचं समोर आलंय. त्यांच्या दोन्ही मुलांवरही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापूर्वीच धुळ्यात 32, अंमळनेरमध्ये 3 तर पाचोर्‍यात 1 असे एकूण 36 गुन्हे दाखल आहेत. त्यांचा मुलगा देवेंद्र सोनावर याच्यावर धुळ्यात 6 तर भूषण सोनार याच्यावरही धुळ्यात 3 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातल्या 25 गुन्हेगारांमध्ये 4 आरोपी हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

close