मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

March 29, 2013 11:37 AM0 commentsViews: 10

29 मार्च

मुंबई : मांटुगा येथील रेल्वे स्टेशनच्या दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मजवळ रूळावर झाड कोसळ्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी 3 च्या सुमारासही घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची धिम्या गतीची वाहतूक कोलमडली होती. घाटकोपरपर्यंत गाड्यांची रांग लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत झाड कापून बाजूला केले आहे. त्यामुळे वाहतूक पुर्वपदावर आली आहे. मात्र दोन तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांनी रूळावर उतरून चालत जाऊन पुढील स्टेशन गाठले तर काहीनी रिक्षा,टॅक्सीकडे धाव घेतली.

close