दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची वसतीगृहाची फी माफ

March 29, 2013 2:43 PM0 commentsViews: 18

29 मार्च

औरंगाबाद : राज्यभरात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारसह अन्य सामाजिक, उद्योगिक संस्था पुढाकार घेत आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांची पुढच्या वर्षाची फी विद्यापीठाने पूर्णपणे माफ केली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलीये. मराठवाड्यातल्या दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी होत होती.

close