पाकवर हल्ला चढवा – बाबा रामदेव

December 25, 2008 9:58 AM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर, कोल्हापूरपाक विरोधात भारताकडं सबळ पुरावे असताना कोणाच्या आदेशाची वाट बघण्याची गरज काय ? असा प्रश्न विचारुन बाबा रामदेव यांनी, तात्काळ आतंकवादी अड्‌ड्यांवर भारतानं हल्ला चढवावा असंही सांगितलं. या हल्ह्यासाठी अमरिकेच्या आदेशाची वाट बघण्याची गरज नाही,असंही स्पष्ट केलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. देशातील भ्रष्ट लोकांना मिटविण्यासाठी मतदाता जागृती अभियान आपण राबविणार आहे. असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.यावेळी बोलताना विविध विषयांवर आपली मतं स्पष्ट केली. "प्रज्ञा ठाकूर या निरापराधी आहेत, असं कधी म्हटलं नाही.पण त्या अपराधी आहेत,असंही मी बोललो नाही. जो पर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत यावर बोलणं चुकीचं आहे" असं त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी राज ठाकरे यांच्यावर आपण कोणतीही टीका केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "राज ठाकरे यांच्या विरोधात मी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मी फक्त कोणीही राष्ट्राला विघातक असं मुद्दे उपस्थित करु नये अंस बोललो होतो" असं ते म्हणाले.देशामध्ये राष्ट्रीय चिंतनाची गरज आहे. जो पर्यंत हे होत नाही, तो पर्यंत भारत एकसंघ होणं कठीण आहे, असंही त्यांनी सांगितलं.

close