उत्तर कोरियाची अमेरिकेवर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी

March 29, 2013 4:23 PM0 commentsViews: 15

29 मार्च

उत्तर कोरियानं अमेरिकेवर आणि तिच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने लष्करी कवायतींसाठी काल दक्षिण कोरियाकडे छुपे बाँबर्स पाठवल्यानंतर संतापलेल्या उत्तर कोरियाने हा इशारा दिलाय. त्याचवेळी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग युन यांनी सर्व रॉकेट डागण्यास तयार ठेवण्याचा लेखी आदेश दिलाय. तसंच किम यांनी लष्करी अधिकार्‍यांची बैठकही घेतली. बुधवारी उ. कोरियानं दक्षिण कोरियाबरोबरची शेवटची हॉटलाईनही तोडल्यानंतर दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाकडं सगळ्याचं लक्ष गेलंय. गेल्याच महिन्यात उ. कोरियाने अण्वस्त्र चाचणी केली होती.

close