मोदींच्या भेटीसाठी मोजले साडे आठ लाख?

March 30, 2013 9:28 AM0 commentsViews: 32

30 मार्च

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकन व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळनं गुरुवारी भेट घेतली होती. त्यावरून आता एक वाद सुरू झाला आहे. पैसे घेऊन मोदींची भेट घडवून आल्याचा दावा, हाय इंडिया या शिकागोतल्या वर्तमानपत्रानं केला आहे. या शिष्टमंडळात व्यापार्‍यांसोबतच अमेरिकेचे तीन सिनेटर्सही होते. नॅशनल इंडियन अमेरिकन पब्लिक पॉलिसी इन्स्टिट्यूटनं या दौर्‍याचं आयोजन केलं होतं. गुजरातसह ताजमहाल, रणथंबोर अभयारण्य, राजस्थान, राजवाडा, सुवर्णमंदिर आणि कर्नाटकला या शिष्टमंडळानं भेट दिली होती. त्यासाठी शिष्टमंडळातल्या सदस्यांना 1 लाख 62 हजार ते 8 लाख 68 हजार इतकी रक्कम मोजावी लागली. या पॅकेजमध्येच नरेंद्र मोदींच्याही भेटीचा समावेश होता, असा दावा हाय इंडियाने केला आहे. म्हणजेच मोदींच्या भेटीसाठी या शिष्टमंडळाकडून आयोजकांनी पैसे घेतले, असा त्याचा अर्थ होतोय. पण भारतातल्या काही ठिकाणांना भेट देण्यासाठी शिष्टमंडळातल्या सदस्यांकडून पैसे घेण्यात काहीच गैर नसल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

close