राम कदम,क्षितिज ठाकूर यांची सुरक्षा काढली

March 30, 2013 10:09 AM0 commentsViews: 15

30 मार्च

मुंबई : विधानभवनात पीएसआय मारहाण प्रकरणात निलंबित झालेले मनसेचे आमदार राम कदम, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलंय. मारहाण प्रकरणी या दोघा निलंबित आमदारांना जेलमध्ये जावं लागलं होतं. जेव्हा ते जामिनावर तुरूंगातून बाहेर आले त्यावेळी त्यांची नेहमीची सुरक्षाव्यवस्था त्यांच्यासोबत नव्हती. राम कदम यांच्या सुरक्षेसाठी 24 तास एक कॉन्स्टेबल दोन शिफ्टमध्ये तैनात असे. तर क्षितिज ठाकूर यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा एक कॉन्स्टेबल होता. आता ही सुरक्षा पोलिसांनी काढून घेतलीय. पण, पूर्वी त्यांना दिलेली सुरक्षा कायदेशीर होती का, याबाबतही संदिग्धता आहे. तर राम कदम यांनी काही दिवसांपुर्वी एका रेशनिंग अधिकार्‍याला केलेल्या मारहाणी प्रकरणी अटकपुर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तो जामिनही नाकारण्यात आल्याने आता राम कदम यांना त्या जुन्या मारहाण प्रकरणात पुन्हा अटक होऊ शकते.

close