नागपूर विद्यापीठात अभाविपने सिनेटची बैठक उधळवली

March 30, 2013 10:00 AM0 commentsViews: 17

30 मार्च

नागपूरमध्ये सिनेटच्या बैठकीपूर्वी अभाविपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. सर्व परीक्षा वेळेवर घेण्याची मागणी करत विद्यापीठ प्रशासनाविरूध्द अभाविपने आंदोलन केलं. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचीही तोडफोड केली. गेल्या 54 दिवसांपासून सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा बहिष्कार सुरू आहे. विद्यापीठाच्या काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि सिनेट सदस्यांमध्ये नाराजी आहे. म्हणूनच दिक्षांत सभागृहात होणार्‍या बैठकीपुर्वी सभागृहात गोंधळ घालत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचीही तोडफोड केली.

close