अण्णांच्या देशव्यापी दौर्‍याला आजपासून सुरुवात

March 30, 2013 10:05 AM0 commentsViews: 27

30 मार्च

अमृतसर : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचा आजपासून देशव्यापी दौरा सुरू झाला आहेत. अमृतसरमधल्या ऐतिहासिक जालियनवाला बाग मधल्या शहीद स्मारकावर श्रध्दांजली वाहून अण्णा आपल्या दौर्‍याला सुरवात करणार आहेत. अरविंद केजरीवाल आणि टीम सोबत दुरावल्यानंतरचा अण्णांचा हा पहिलाच देशव्यापी दौरा आहे. जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार, निवडणूक कायद्यात दुरूस्ती, शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार या आणि इतर मुद्यांवर अण्णांचा या दौर्‍यात भर असणार आहे. या टप्प्यात आण्णा हजारे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जवळपास 35 सभा घेणार आहेत. जनजागृती करण्यासाठी हा दौरा असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

close