रिटेल इंडस्ट्रीलाही बसतोय मंदीचा फटका

December 25, 2008 10:38 AM0 commentsViews:

25 डिसेंबर नवी दिल्लीअविजीत द्विवेदीमंदीचा फटका इतर क्षेत्रांसारखाच रिटेल इंडस्ट्रीलाही बसलाय. ख्रिसमस आणि न्यू इयर अशा फेस्टिव्ह सीझनमध्येही बाजार आणि मॉल्समध्ये गर्दी जेमतेमच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धंदा निम्म्याने घटला आहे. मॉल्सचं भाडं देणंही मॉल्सच्या मालकंाना कठीण बनलं आहे.मॉलमधील अनेक दुकानदार सद्या चिंतेत आहेत कारण ख्रिसमससारखा सण असूनही त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. यावर्षात सणासुदींच्या दिवसात गेल्या वर्षाच्या तुलनेत रिटेल दुकानांची कमाई अर्धीच झाली आहे. दुकानदारांच्यामते, मॉल्समध्ये येणारे ग्राहक 30% घटलेत. वीकेंड शॉपिंगसाठी येणारे ग्राहक फक्त विंडो शॉपिंग करत आहेत त्यामुळे रिटेल दुकानांचा गल्ला रिकामाच राहतोय.मंदीच्या अशा फटक्यामुळे काहीे दुकानदारांनी कर्मचारी वर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मॉल्समधली काही रीटेल दुकानं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता ख्रिसमस आणि नवीन वर्ष तोंडावर आलं असतानाही रिटेल दुकानांचा धंदा थंडावलाय. त्यामुळे मॉल्स मॅनेजमेंटकडे दुकानांच्या जागेचं भाडं कमी करून मागण्याखेरीज रिटेल दुकानदारांकडे पर्याय उरलेला नाही.

close