आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जुंपले कँटीनमध्ये कामाला

March 30, 2013 3:31 PM0 commentsViews: 11

30 मार्च

अहमदनगर : समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतल्या वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये बालकामगार म्हणून जुंपल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. कर्जत तालुक्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळेतली ही घटना आहे. या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना बस स्टॅण्डवर सक्तीने वडापाव विकायला लावलं जात होतं. त्याला नकार दिला तर त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात येत होती. वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना आळीपाळीने या कँटीनमध्ये काम करण्याची सक्ती केली जात होती. गावकर्‍यांच्या सजगतेमुळे आणि चाईल्ड लाईनच्या पुढाराने हा प्रकार उघकीला आलाय. कर्जत पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र, संचालक शामला तांबे अजूनही फरार आहे.

close