नरेंद्र मोदी भाजपच्या संसदीय समितीत?

March 30, 2013 3:39 PM0 commentsViews: 17

30 मार्च

नवी दिल्ली : निवडणुकीच्या वातावरणात आता भाजप पक्षांतर्गत वेगळी रणनीती आखतंय. त्यानुसार उद्या भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह आपली नवी टीम जाहीर करतील. यात सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे तब्बल सहा वर्षांनी भाजपच्या संसदीय समितीत परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदींना महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एवढंच नाही, तर मोदींचे अत्यंत निकटवर्तीय अमित शहा यांचीही पक्षाच्या सरचिटणीसपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुजरात दंगलीदरम्यान, मोदी आणि सोहराबुद्दीन बनावट चकमकी दरम्यान अमित शहा हे गृहमंत्री होते. याप्रकरणात ते आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली तर, भाजप अंतर्गत आणि राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय असणार आहे.

close