हिंगोलीत वाहताय पाण्याचे पाट

March 30, 2013 8:55 AM0 commentsViews: 4

30 मार्च

हिंगोली : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या वापराविषयी एकीकडं जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे मात्र सरकारच्या आवाहनाला सरकारी अधिकारीच हरताळ फासत असल्याचं चित्र हिंगोलीत दिसतंय. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जातंय. आज सकाळी 18 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पाईप लाईनचा वॉल्व तुटला. त्यामुळे पहाटेच्या अंधारात रस्त्यावरून जणू नदीच वाहतेय, असं चित्र या वाहत्या पाण्यामुळं निर्माण झालं. दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचा एक एक थेंब मौल्यवान असताना लाखो लिटर पाणी केवळ अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे वाया गेलं. त्यामुळे हिंगोलीकरांना आता अनेक दिवस भर उन्हाळ्यात तहानलेलं रहावं लागतंय. याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

close