दुष्काळाला सिंचन घोटाळाच जबाबदार -राजनाथ सिंह

April 1, 2013 9:42 AM0 commentsViews: 18

01 एप्रिल

जालना : महाराष्ट्रातल्या दुष्काळाला राज्यातला सिंचन घोटाळा जबाबदार आहे असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलाय. राजनाथ सिंह यांचा दुष्काळी दौरा आजपासून जालन्यामधून सुरू झाला आहे. या दौर्‍यामध्ये ते दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना भेटणार आहेत. तसंच चारा छावणी, कोरड्या विहिरींची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय, पण इथल्या राज्यकर्त्यांना त्याचं काहीच वाटत नाही असा आरोपही त्यांनी केला. ते जालन्यात बोलत होते.

close