नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंनी गड राखला

April 1, 2013 11:54 AM0 commentsViews: 21

01 एप्रिल

कोकणात महसूल मंत्री नारायण राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीत आपला गड शाबूत राखला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. नारायण राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवलीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत. गुहागर नगरपंचायतीत 17 पैकी 11 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. तर सहा जागा शिवसेना-भाजपाकडे गेल्या आहेत. देवरूख नगरपंचायतीत 17 पैकी 12 जागा मिळवत शिवसेना -भाजपने सत्ता मिळवली. देवरुख नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 12 जागांवर सेना-भाजप, 5 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.

close