नरिमन हाऊस पुन्हा उभं राहणार

December 25, 2008 9:45 AM0 commentsViews: 4

25 डिसेंबर मुंबईहन्नुकाह हा ज्यू समाजाचा सण. हन्नुकाह म्हणजेच प्रकाशाचा सण. त्यानिमित्तानं मुंबईतील ज्यू समुदायानं नरिमन हाऊस पुन्हा नव्याने बांधण्याचा संकल्प केला. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण होतोय. या हल्ल्यात नरिमन हाऊस ही बिल्डिंग पूर्णपणे उध्वस्त झाली. ज्यू समाजाचं हे प्रार्थनास्थळ. हे प्रार्थनास्थळ पुन्हा उभं करण्याचा निर्धार ज्यू लोकांनी व्यक्त केला आहे. नरिमन हाऊसमध्येही प्रार्थना करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर ज्यू बांधव एकत्र आले होते. दहशतवादी हल्ल्यात या नरिमन हाऊसमधल्या 6 जणांचा बळी गेला होता. त्यात रब्बाय होल्झबर्ग आणि त्यांची पत्नी रिवका यांचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बळी गेलेल्यांना ज्यू बांधवांनी श्रद्धांजली वाहिली.

close