आजपासून रेल्वे आणि बसचा प्रवास महागला

April 1, 2013 3:07 PM0 commentsViews: 7

01 एप्रिल

आजपासून बेस्ट आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहेत. मुंबईमध्ये आजपासून बेस्टचा प्रवास महागलाय. किमान भाड्यामध्ये एक रुपयाने वाढ झालीय. बेस्ट बसच्या पहिल्या दोन टप्प्याच्या प्रवासासाठी आता एक रूपया जास्त मोजावा लागणार आहे. बेस्टचे किमान 5 रुपयांचे तिकीटासाठी आता सहा रुपये मोजावे लागणार आहे. साध्या बससाठी तिकीटामागे एक रूपया तर एसी बससाठी तिकीटामागे पाच रूपये भाडेवाढ झालीय. तसंच रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्याप्रमाणे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे भाडे, रिझर्वेशन, तात्काळ तिकीट, रिझर्वेशन रद्द करण्याच्या भाड्यांतही वाढ झाली आहे. वेटींग लिस्टवरचं तिकीट रद्द करण्याच्या भाड्यातही वाढ झाली आहे.

close