स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल शेवाळे ?

April 1, 2013 3:14 PM0 commentsViews: 51

01 एप्रिल

मुंबई महापालिकेच्या चाव्या पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांच्याकडेच सोपवण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. राहुल शेवाळंेनी चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. तर विरोधी पक्षाकडून स्थायी समितीसाठी ज्योत्स्ना सिंह आणि शिक्षण समितीसाठी शिवानंद शेट्टी यांनी अर्ज दाखल केला. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सेना-भाजपचे मनोज कोटक रिंगणात उतरले आहे. पालिकेतलं एकंदर संख्याबळ पाहता सेना-भाजप हा गड राखण्यात यशस्वी होतील असंच चित्र आहे.

close